राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र पिनकोड 416707

इतिहास

कशेळीचा इतिहास

कशेळी हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक प्राचीन व निसर्गरम्य कोकणी गाव. प्राचीन कनकादित्य सूर्य मंदिर, कातळशिल्पे आणि ब्रिटीशपूर्व काळातील ऐतिहासिक वास्तू यांमुळे गावाला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे.

विसाव्या शतकातील साहित्यिक वारसा

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कशेळीला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली ती थोर मराठी साहित्यिक कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी. मुंबईच्या ‘मनोरंजन’ मासिकाचे संपादक असलेले गुर्जर आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या जन्मगावी निवृत्त झाले व कोकणच्या ग्रामीण जीवनातून प्रेरणा घेऊन त्यांनी आधुनिक मराठी कथा-साहित्याला आकार दिला. १९ सप्टेंबर १९६२ रोजी कशेळी येथे त्यांचे निधन झाले.

शिक्षणाची आधुनिक वाटचाल

कै. गुर्जरांच्या स्मृतीप्रित्यर्थ १६ जून १९६७ रोजी स्थापन झालेल्या श्री लक्ष्मीनारायण शिक्षण प्रसारक मंडळामार्फत गावात विठ्ठल सीताराम गुर्जर विद्यामंदिर सुरू करण्यात आले. कशेळीच्या आजच्या शैक्षणिक व सांस्कृतिक जीवनाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

१९८७ साली प्रकाशित झालेल्या वि. सी. गुर्जर विद्यामंदिर स्मरणिकेत गावच्या साहित्यिक-सामाजिक वाटचालीची सविस्तर नोंद आढळते.