राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र पिनकोड 416707

प्रमुख आकर्षणे

कशेळीची प्रमुख आकर्षणे

निसर्गसौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा यांचा एक दुर्मीळ संगम कशेळीला लाभला आहे. कोकणच्या किनाऱ्यावरील या गावात भेट देणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने न चुकवू नये अशी काही ठिकाणे :

श्री कनकादित्य सूर्यमंदिर

भारतातील अत्यंत दुर्मीळ सूर्यमंदिरांपैकी एक. कै. नाना शंकर शेठ यांनी बांधलेला ८०′ × ४०′ आकाराचा प्रशस्त सभामंडप व ८००+ वर्षांचा ताम्रपटसिद्ध इतिहास. सविस्तर →

श्री लक्ष्मीनारायण मंदिर

कनकादित्यापेक्षाही जुने मानले जाणारे; संभाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेले. तळघरातून थेट समुद्रापर्यंत पोचणारा गूढ भुयार — एक अद्भुत वारसा.

तीन मैलांचा कोकण किनारा

उंच कडे, हिरवीगार केवड्याची बने आणि लाटांचा कधीही न संपणारा आवाज. कडयांवर रोज सायंकाळी सूर्यास्ताचे दर्शन“एक अविस्मरणीय क्षण” — घेण्यासाठी ग्रामस्थांचा रोजचा नित्यक्रम आहे. पर्यटकांसाठी ही पर्वणीच.

देसाई बांध (खार बांध)

सुमारे ४०० वर्षांपूर्वी बांधलेला; मूळ स्वरूपात आजही कार्यरत असलेला ऐतिहासिक खार बांध. भोवती सोनेरी भातशेती व हिरवी सुपारी-नारळाची बने.

श्री दत्तमंदिर, कशेळी बांध

स्वामी विश्वनाथ महाराज बोरकर यांनी बांधलेले परिसरातील पहिले दत्तमंदिर. दत्तजयंतीला ६ दिवसांचा उत्सव व ७ दिवस अखंड तंबोरा-नामस्मरण.

श्री जाखादेवी, श्री आगबादेवी

नवरात्र आणि वार्षिक उत्सवांच्या निमित्ताने जिल्ह्यातील लांबवरून लोक भेट देतात.

विठ्ठल सीताराम गुर्जर विद्यामंदिर

थोर मराठी कथाकार कै. वि. सी. गुर्जर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेले हायस्कूल — गावच्या आधुनिक साहित्यिक वारशाचे जिवंत स्मारक.

सर्व ठिकाणे एका दिवसात आरामात पाहता येतात. पावसाळ्यानंतर (ऑक्टोबर–मार्च) हा भेटीचा सर्वोत्तम काळ.