राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र पिनकोड 416707

लोकसंख्या

कशेळीची लोकसंख्या

कशेळी हे साधारणपणे ३,००० लोकवस्तीचे गाव असून शहरांपासून दूर असले तरी आधुनिक सुविधांनी जोडले गेले आहे.

वाडावाडी रचना

गावाच्या वस्तीचे ढोबळमानाने दोन भाग पडतात — वरचा वाडाखालचा वाडा. आत मधे दुर्गवाडा, आगवेकरवाडी, फोडकरवाडी, कोंभेवाडी, सावरेवाडी, सुतारवाडी, आवळीचीवाडी, तेलीवाडी, बौद्धवाडी अशा अनेक छोट्या वस्त्या आहेत.

जातीसंरचना & समाजजीवन

गावात ब्राह्मण, मराठा, सुतार (विश्वकर्मा), गुरव, बौद्ध (पूर्वीचे हरिजन), मुस्लिम अशा विविध समाजांची सलोख्याची एकत्र वस्ती आहे. प्रमुख ज्ञाती →

आरोग्य सुविधा

कै. श्रीधर बाळाजी कुळकर्णी स्मारक समितीने जमीन विकत घेऊन ४०′ × २०′ पक्की इमारत बांधली असून तेथे कायमचा डॉक्टर नेमून दवाखाना सुरू करण्याची योजना लवकरच मूर्त स्वरूप घेईल. सध्या गावात एक मेडिकल स्टोअरही आहे.

शैक्षणिक स्थिती

गावात पूर्वप्राथमिक शाळा, प्राथमिक शाळा व हायस्कूल — एकूण सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सविस्तर →

स्थानिक स्वराज्य

आधुनिक व लोकाभिमुख कशेळी ग्रामपंचायत गावाच्या विकासाचे काम पाहते. १९८७−८८ साली चेअरमन व सरपंच — श्री सदाशिव भगवंत पळसुले; उपसरपंच — श्री रमेश पांडुरंग ओळकर.