सहकारी संस्था
कशेळीच्या सहकारी संस्था
कशेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.
स्थापना : १९१६ · मु. पो. कशेळी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी · ऑडिट वर्ग “अ”
शंभर वर्षांची परंपरा असलेली ही सहकारी संस्था कशेळी ग्रामस्थांच्या आर्थिक व कृषीविषयक गरजांची मुख्य भागीदार आहे.
| सभासद संख्या | ७७३ |
|---|---|
| सभासद भाग भांडवल | रु. ६५,६५५ |
| शासन भाग भांडवल | रु. २०,००० |
| ठेवी | रु. ६८,४८८ |
| निधी | रु. ७५,८९६ |
| खेळते भांडवल | रु. ३,६७,७२८·८० |
संस्थेच्या सेवा :
- शेतकरी कर्ज पुरवठा
- लघुउद्योग कर्ज पुरवठा
- शेतकऱ्यांना सुधारित बियाणे पुरवठा
- ग्राहक भांडार (कंझ्युमर स्टोअर्स)
- नियमित व अनियंत्रित कापड दुकान
मुष्टिफंड संस्था, कशेळी
सांस्कृतिक कार्यक्रम व नाटके यांसाठी पडदे व इतर साहित्य
गावात होणारे नाटक-प्रयोग, सांस्कृतिक उत्सव यांच्यासाठी मंच-पडदे व सांगीतिक साहित्य पुरविणारी ग्रामीण संस्था.
चेअरमन : ज. वि. कशेळकर · सेक्रेटरी : भा. ना. भागवत.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक — कशेळी शाखा
शेतकरी कर्ज, लघुउद्योग कर्ज व इलेक्ट्रिक पंप कर्ज पुरविणारी जिल्हा बँकेची शाखा गावातच कार्यरत आहे.
सहकारी कौल-उत्पादन कारखाना
भारतातील सहकारी तत्त्वावरील पहिला कौल-उत्पादन कारखाना कशेळी परिसरात २७ वर्षांहून यशस्वीपणे चालू आहे; नवीन शाखा वातुळ येथे लवकरच सुरू होत आहे.
एकात्मिक ग्रामीण विकास योजना
या योजनेखाली कशेळीतील गरीब शेतकऱ्यांना बँकेमार्फत बैल, रेडे, गाई व म्हशी; शेतकरी जोडगटांसाठी इलेक्ट्रिक पंप, बैलगाडी, शिवणाचे मशीन, कोंबड्या पाळणे, बकऱ्या पाळणे, मासळी विकणे, स्टेशनरी व किराणा दुकान, पानाची गादी, गोबर गॅस वगैरे छोट्या व्यवसायांसाठी कर्ज व सबसिडी मिळते.