राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र पिनकोड 416707

सहकारी संस्था

कशेळीच्या सहकारी संस्था

कशेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.

स्थापना : १९१६ · मु. पो. कशेळी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी · ऑडिट वर्ग “अ”

शंभर वर्षांची परंपरा असलेली ही सहकारी संस्था कशेळी ग्रामस्थांच्या आर्थिक व कृषीविषयक गरजांची मुख्य भागीदार आहे.

सभासद संख्या७७३
सभासद भाग भांडवलरु. ६५,६५५
शासन भाग भांडवलरु. २०,०००
ठेवीरु. ६८,४८८
निधीरु. ७५,८९६
खेळते भांडवलरु. ३,६७,७२८·८०

संस्थेच्या सेवा :

  1. शेतकरी कर्ज पुरवठा
  2. लघुउद्योग कर्ज पुरवठा
  3. शेतकऱ्यांना सुधारित बियाणे पुरवठा
  4. ग्राहक भांडार (कंझ्युमर स्टोअर्स)
  5. नियमित व अनियंत्रित कापड दुकान

मुष्टिफंड संस्था, कशेळी

सांस्कृतिक कार्यक्रम व नाटके यांसाठी पडदे व इतर साहित्य

गावात होणारे नाटक-प्रयोग, सांस्कृतिक उत्सव यांच्यासाठी मंच-पडदे व सांगीतिक साहित्य पुरविणारी ग्रामीण संस्था.
चेअरमन : ज. वि. कशेळकर · सेक्रेटरी : भा. ना. भागवत.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक — कशेळी शाखा

शेतकरी कर्ज, लघुउद्योग कर्ज व इलेक्ट्रिक पंप कर्ज पुरविणारी जिल्हा बँकेची शाखा गावातच कार्यरत आहे.

सहकारी कौल-उत्पादन कारखाना

भारतातील सहकारी तत्त्वावरील पहिला कौल-उत्पादन कारखाना कशेळी परिसरात २७ वर्षांहून यशस्वीपणे चालू आहे; नवीन शाखा वातुळ येथे लवकरच सुरू होत आहे.

एकात्मिक ग्रामीण विकास योजना

या योजनेखाली कशेळीतील गरीब शेतकऱ्यांना बँकेमार्फत बैल, रेडे, गाई व म्हशी; शेतकरी जोडगटांसाठी इलेक्ट्रिक पंप, बैलगाडी, शिवणाचे मशीन, कोंबड्या पाळणे, बकऱ्या पाळणे, मासळी विकणे, स्टेशनरी व किराणा दुकान, पानाची गादी, गोबर गॅस वगैरे छोट्या व्यवसायांसाठी कर्ज व सबसिडी मिळते.