लोकसंख्या
कशेळीची लोकसंख्या
कशेळी हे साधारणपणे ३,००० लोकवस्तीचे गाव असून शहरांपासून दूर असले तरी आधुनिक सुविधांनी जोडले गेले आहे.
वाडावाडी रचना
गावाच्या वस्तीचे ढोबळमानाने दोन भाग पडतात — वरचा वाडा व खालचा वाडा. आत मधे दुर्गवाडा, आगवेकरवाडी, फोडकरवाडी, कोंभेवाडी, सावरेवाडी, सुतारवाडी, आवळीचीवाडी, तेलीवाडी, बौद्धवाडी अशा अनेक छोट्या वस्त्या आहेत.
जातीसंरचना & समाजजीवन
गावात ब्राह्मण, मराठा, सुतार (विश्वकर्मा), गुरव, बौद्ध (पूर्वीचे हरिजन), मुस्लिम अशा विविध समाजांची सलोख्याची एकत्र वस्ती आहे. प्रमुख ज्ञाती →
आरोग्य सुविधा
कै. श्रीधर बाळाजी कुळकर्णी स्मारक समितीने जमीन विकत घेऊन ४०′ × २०′ पक्की इमारत बांधली असून तेथे कायमचा डॉक्टर नेमून दवाखाना सुरू करण्याची योजना लवकरच मूर्त स्वरूप घेईल. सध्या गावात एक मेडिकल स्टोअरही आहे.
शैक्षणिक स्थिती
गावात २ पूर्वप्राथमिक शाळा, ३ प्राथमिक शाळा व १ हायस्कूल — एकूण सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सविस्तर →
स्थानिक स्वराज्य
आधुनिक व लोकाभिमुख कशेळी ग्रामपंचायत गावाच्या विकासाचे काम पाहते. १९८७−८८ साली चेअरमन व सरपंच — श्री सदाशिव भगवंत पळसुले; उपसरपंच — श्री रमेश पांडुरंग ओळकर.