राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र पिनकोड ४१६७०७

संबंधित पुस्तके

कशेळी गावाशी निगडित दुर्मिळ ग्रंथ, स्मरणिका व ऐतिहासिक दस्तऐवजांचा डिजिटल संग्रह.

विठ्ठल सीताराम गुर्जर विद्यामंदिर स्मरणिका

श्री लक्ष्मीनारायण शिक्षण प्रसारक मंडळ, कशेळी · कै. वि. सी. गुर्जर यांच्या २५ व्या स्मृतिदिनी प्रकाशित · शनिवार, १९ सप्टेंबर १९८७

थोर मराठी साहित्यिक कै. विठ्ठल सीताराम गुर्जर (अण्णा) यांच्या स्मरणार्थ कशेळी गावात उभारलेल्या विद्यामंदिराच्या वतीने प्रकाशित झालेली ही स्मरणिका कै. गुर्जरांच्या साहित्यिक कारकीर्दीचा, कशेळीच्या सामाजिक जीवनाचा आणि शाळेच्या वाटचालीचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यात मधु मंगेश कर्णिक यांचा हृद्य लेख, स्वामी गगनगिरी महाराज यांचे आशीर्वाद, मा. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व शिक्षणमंत्री प्रा. राम मेघे यांचे संदेश आणि अनेक माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींचा समावेश आहे.

Open in new tab ↗ Download

कै. वि. सि. गुर्जर यांचा पत्रव्यवहार

थोर मराठी साहित्यिक कै. विठ्ठल सीताराम गुर्जर ("अण्णा") यांना विसाव्या शतकाच्या आरंभी मुंबईच्या साहित्यिक वर्तुळातून आलेल्या हस्तलिखित पत्रांचा संग्रह. यात "मनोरंजक ग्रंथ प्रसारक मंडळी" (संपादक — का. र. मित्रा) यांच्या लेटरहेडवरील पत्रं व कशेळी पत्त्यावर आलेली पाकिटं समाविष्ट आहेत. एकोणिसाव्या ते विसाव्या शतकाच्या संक्रमणकाळातील मराठी संपादक, लेखक व मित्रांच्या परस्पर संबंधांची दुर्मिळ नोंद. ४० पाने.

Open in new tab ↗ Download

कशेळी गांवचे गाणे

भास्कर नारायण भागवत यांनी रचलेले हे पारंपरिक मराठी गीत — कशेळीची भूमी, श्री देव कनकादित्य मंदिर व गावच्या लोकजीवनाची काव्यमय ओवी. प्रत्येक कडवं "कशेळी आऊन कनकोबा पाही" या ध्रुवपदाने पूर्ण होतं — गाव, मंदिर व जत्रेची सुरेख ओळख करून देणारं संक्षिप्त परंतु गोड स्मरणपत्र. दोन पाने. JVKArchives यांच्या संग्रहातून.

Open in new tab ↗ Download