राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र पिनकोड 416707

वाहतूक व्यवस्था

कशेळीची वाहतूक व्यवस्था

कशेळी हे शहरांपासून दूर असले तरी रस्ते, बोट व विमान या तीनही मार्गांनी जोडलेले आहे.

रस्त्याने

  • रत्नागिरीहून : शहराच्या दक्षिणेस सुमारे १८ मैल; मधल्या २ मैल खाडी असल्यामुळे थेट सडक नाही.
  • राजापूरहून : पूर्वेस १८ मैल; डांबरी रस्ता.
  • मुंबई–गावखडी एस. टी. बस : रोज सायंकाळी ५ : ४५ वा. बॉम्बे सेंट्रल येथून सुटते; दुसऱ्या दिवशी सकाळी ५·४५ वा. म्हणजे १२ तासांनी कशेळीला पोचते.
  • कशेळी बांध — आगवेकरवाडी मार्गे गावखडीला जाणारी एस. टी. बस संपूर्ण गावातून जाते. ४ लाख रुपये खर्चाचे रस्त्याचे काम जवळ जवळ पूर्ण.

जलमार्गाने

  • भाऊचा धक्का (मुंबई) ते मुसाकाजी बोट : सकाळी १० वा. निघणारी बोट रात्री १० ते ११ या वेळेत मुसाकाजी बंदरात पोचते.
  • मुसाकाजी–गावखडी एस. टी. बस : दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वा. कशेळीला पोचते.

हवाई मार्गाने

वायुदूतच्या विमानाने रत्नागिरीला ५० मिनिटे; तेथून पुढे पावस — पूर्णगड — गावखडी मार्गे कशेळीला २·३० ते ३ तासांत पोचता येते.

गावांतर्गत

एस. टी. बस गावच्या मुख्य रस्त्यावरून संपूर्ण वाडावाडीतून जाते. वायंगोड वहाळ ते कशेळी बांध हा सुमारे अर्धा किलोमीटरचा खारलँड बंधारा शासनाने तीन वर्षांपूर्वी बांधला; त्यामुळे शेजारच्या पाणवठ्यांच्या वाटा सुटसुटीत झाल्या.

संदर्भ : वि. सी. गुर्जर विद्यामंदिर स्मरणिका (१९८७).